पाऊस
पाऊस हा असा
चिंब भिजवणारा
कधी वादळी,
तर कधी अवकाळी बरसणारा;
पाऊस हा असा
जणू थेंबात आभाळ भरलेला
काळ्या ढगातून रिपरिप कधी
तर कधी रिमझिम बरसणारा;
पाऊस हा असा
टपोरी थेंबात ओथंबणारा
हिरवा साज चढवून
काळया मातीला गाभण करणारा;
पाऊस हा असा
मनाला भुरळ घालून
वेड लावणारा
कधी आतून
हलकेच ओलावणारा......
©शीतल दरंदळे
( तुम्हाला कसा वाटतोय पाऊस?)☺😊


3 टिप्पण्या
Mastach����
उत्तर द्याहटवामनःपूर्वक धन्यवाद 😊🤗🤗
हटवामनःपूर्वक धन्यवाद ☺☺
उत्तर द्याहटवाNo spam messages please