मित्रानो आज आपण स्नॅपचॅट या लोकप्रिय सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म बद्दल माहिती करून घेऊयात. आजकाल इंटरनेट आणि स्मार्ट फोन मुळे सर्वजण सोशल मेडियावर असतात. पण स्नॅपचॅटबद्दल तुम्हाला किती माहिती आहे? स्नॅपचॅटचा इंतिहास काय आहे? ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडीओ मध्ये मिळणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत पहायला विसरू नका.
स्नॅपचॅट हे सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहे तसेच मेसेजिंग अॅप आहे. ज्यावर तुम्ही तुमच्या मित्रांसह 10 सेकंदांपर्यंतचे फोटो आणि छोटे व्हिडिओ शेअर करू शकता. स्नॅपचॅटची आणखी 2 वैशिष्ट्ये आहेत ती म्हणजे ग्रुप चॅट आणि व्हिडिओ कॉल. स्नॅपचॅटची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्ही त्यावर व्हिडिओ,फोटो किंवा मेसेज तुमच्या मित्राला पाठवल्यावर तो व्हिडिओ, फोटो किंवा मेसेजकेवळ काही विशिष्ट वेळेसाठी सेव्ह केला जातो. मित्राने तो वाचल्यावर काही वेळाने आपोआप delete होऊन जातो.
स्नॅपचॅटचा इतिहास काय आहे ?
स्नॅपचॅटची सुरुवात इव्हान स्पीगल, बॉबी मर्फी आणि रेगी ब्राउन यांनी 2011 मध्ये iOS वापरकर्त्यांसाठी केली होती. हे तिन्ही मित्र स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे विद्यार्थी होते. इमेज पाठवल्यानंतर रेगी ब्राउनच्या मनात आपोआप काढून टाकण्याची कल्पना आली.त्यानंतर त्यांनी इव्हान स्पीगलला याबाबत सांगितले. इव्हानला व्यवसायाचा खूप अनुभव होता.काही काळानंतर दोघांनी बॉबी मर्फीला त्यांच्या टीममध्ये घेतले कारण बॉबी एक अॅप डेव्हलपर होता. यानंतर, तिघांनी काही महिने एकत्र काम केले आणि 6 जुलै 2011 रोजी पिकाबू नावाने स्नॅपचॅट सुरू केले. त्यानंतर लवकरच, इव्हान आणि मर्फी यांनी ब्राउनला कंपनीतून काढून टाकले. त्यानंतर सप्टेंबर 2011 मध्ये त्याचे नाव पिकाबू वरून बदलून स्नॅपचॅट करण्यात आले. ८ मे २०१२ रोजी रेगी ब्राउनने स्नॅपचॅटवर हक्क सांगितला. परंतु कायद्याने त्याचे काही योगदान नसल्याने तो Snapchat च्या कोणत्याही शेअरसाठी पात्र ठरला नाही. त्याची लढाई चालू राहिली आणि सप्टेंबर 2014 मध्ये रेगी ब्राउन $157.5 मिलीयन रोख घेऊन सेटल झाला.
स्नॅपचॅटचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते update होत राहिले. नवनवे features जोडत राहिले. 2012 मध्ये स्नॅपचॅट अँड्रॉइड प्लेस्टोअरवर उपलब्ध झाले. त्यापूर्वी ते फक्त iOS platform वर उपलब्ध होते. अँड्रॉइड वर आल्यामुळे ते जगभर सहज download होऊ लागले. जानेवारी 2015 मध्ये कंपनीने "डिस्कव्हर" नावाचे एक नवीन वैशिष्ट्य जोडले. जे जाहिरातीसाठी उपयोगी पडले. त्यावर अनेक जाहिराती आणि बातम्या पोस्ट शोधणे सोपे झाले .CNN, BuzzFeed, ESPN, इत्यादी सारख्या अनेक प्रमुख प्रकाशकांनी “Discover” पर्यायाचा वापर केला.त्यानंतर सप्टेंबर २०१६ - Snapchat Inc. चे नाव बदलून Snap Inc असे करण्यात आले. दुसर्यांदा कंपनीचे नाव बदलले.
स्नॅपचॅट लोकप्रिय आहे का ?
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण जगभरात ऑक्टोबर 2020 मध्ये 433 दशलक्ष लोकांनी स्नॅपचॅटचा वापर केला. अमेरिके नंतर सर्वात जास्त Snapchat user हे भारतात आहे. Snapchat आकडेवारी दर्शवते की भारतातील पुरुष हे Snapchat सर्वात जास्त वापरतात. Snapchat भारतीय सदस्यांपैकी सुमारे 60% पुरुष आहेत. Snapchat च्या एकूण जगभरातील जाहिरात प्रेक्षकांपैकी 21% भारतातील आहेत. स्नॅपचॅट मेसेजिंगचा वापर करून दररोज 3.5 अब्ज स्नॅप पाठवले जातात. आकडेवारीनुसार, स्नॅपचॅट वापरकर्त्यांना दिवसाला सुमारे 400 दशलक्ष फोटो मिळतात.आणखी एक मनोरंजक वस्तुस्थिती अशी आहे की जवळजवळ 88% शॉट्स फक्त एका व्यक्तीला पाठवले जातात. वापरकर्ते दररोज 100 पेक्षा जास्त स्नॅप शेअर करतात. दैनिक स्नॅपचॅट वापरकर्त्यांपैकी 82% हे 18-24 वयोगटातील आहेत.किशोरवयीन मुले इतर वयोगटांच्या तुलनेत या प्लॅटफॉर्मचा सर्वात अधिक वापर करत आहेत.
फेसबुक पेक्षा स्नॅपचॅट आणि इंस्टाग्राम हे किशोरवयीन मुलांद्वारे सर्वाधिक वापरले जाणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मानले जातात. एका अमेरिकन विद्यापीठातील 6000 विद्यार्थ्यांवर केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले की 20% मूल स्नॅपचॅट वापरतात. कीबोर्ड वर लिहिण्यापेक्षा मुलांना व्हिडीओतून संपर्क करायला आवडतो. डिसेंबर 2019 मध्ये स्नॅपचॅटला अॅप अॅनीने दशकातील 5वे सर्वाधिक डाउनलोड केलेले मोबाइल अॅप म्हणून निवडले होते. स्नॅपचॅट आकडेवारी दर्शवते की वर्ष-दर-वर्षात 22 टक्के वाढ नोंदवली गेली. सुरुवातीला, स्नॅपचॅटची बहुतांश वाढ उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये नोंदवली गेली.2020 च्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत उत्तर अमेरिकेतून 90 दशलक्ष आणि युरोपमधील 72 दशलक्ष वापरकर्ते होते. 87 दशलक्ष स्नॅपचॅट वापरकर्ते उर्वरित जगातून आहेत. कोविड-19 महामारीच्या काळात स्नॅपचॅट वापरात 50% वाढ झाली.
स्नॅपचॅटने नाकारलेल्या ऑफर
स्नॅपचॅटची लोकप्रियता पाहून सहाजिकच अनेक मोठ्या कंपन्या त्याला विकत घेण्यास उत्सुक होत्या पण स्नॅपचॅटने त्या ऑफर नाकारल्या. फेसबुक ने Whatsapp, Instagram खरेदी केल्यावर 2013 मध्ये, Facebook ने Snapchat मिळवण्यासाठी $3 अब्ज ची रोख ऑफर दिली होती.स्पीगेल आणि मर्फी यांना अवघ्या विसाव्या वर्षी लक्षाधीश बनवणारी ही ऑफर ते धुडकावतील असे कोणालाच वाटले नव्हते , पण त्यांनी ऑफर नाकारली. त्यानंतर याबद्दल उलट सुलट चर्चा सुरु झाली. फेसबुक ऑफरच्या काळात स्नॅपचॅट कमाई करत नव्हते. फेसबुकने नंतर त्यांच्या “पोक” नावाच्या इन-हाऊस अॅपचा वापर करून स्नॅपचॅटला बुडविण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला.
२०१६ मध्ये Snapchat ला Google कडून $30 बिलियन ऑफर मिळाली होती. पण तीही ऑफर त्यांनी नाकारली. तेव्हा तज्ञांनी असे मत मांडले कि स्नॅपचॅट इन्स्टाग्रामसमोर टिकणार नाही. पण तो दावा पूर्णपणे यश्स्वी ठरला नाही.
2017 मध्ये, Snapchat ला $825 दशलक्ष मिळाले, जे 2016 च्या तुलनेत जवळपास दुप्पट कमाई आहे. आता स्नॅपचॅट ज्येष्ठ लोकांना आकर्षित करण्यासाठी नवनवे feature आणत आहेत. फेसबुक ची तगडी स्पर्ध असूनही स्नॅपचॅटने अजून हार मानली नाही, हे कौतुकास्पद आहे.
मित्रनो तुम्हाला Snapchat ची कहाणी कशी वाटली ते जरुर आम्हाला कळवा. तुम्ही याहू ची कहाणी पाहिली आहे का ? नसेल पाहिली तर जरूर पहा. असेच इंटरेस्टिंग माहिती मिळण्यासाठी channel subscribe करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात धन्यवाद

0 टिप्पण्या
No spam messages please