दुखवट्यादरम्यान ध्वज अर्ध्यावर घेण्याचे काय संकेत आहेत? ही प्रथा कुठे सुरु झाली?
कुठल्याही देशाचा राष्ट्रध्वज हा त्याच्या ओळखीचे, अभिमानाचे प्रतिकआहे. तो कायम फडकत रहावा ही प्रत्येक देशवासीयाची इच्छा असते. पण काही वेळा हा राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जातो. याचा नेमका अर्थ काय आणि ही प्रथा सुरु कुठे झाली याची माहिती आपण करून घेऊयात .
राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जाणे हे राष्ट्रीय किंवा राज्य शोकाचे प्रतीक आहे. एखाद्या सन्माननीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर राष्ट्रीय किंवा राज्य शोक घोषित करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतींकडे आहे. ती मृत व्यक्ती म्हणजे देशासाठी खूप मोठी ओळख असते, त्यामुळे संपूर्ण देश यात दुःखात सामील होतो. राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवून तो दुखवटा किती दिवस असेल याचा कालावधीही ठरवला जातो. जेव्हा राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जातो, तेव्हा तो प्रथम पूर्ण उंचीवर उंचावला जातो आणि नंतर हळू हळू अर्ध्यावर खाली केला जातो. जर राष्ट्रध्वजासह इतर कोणत्याही देशाचा किंवा संस्थेचा ध्वज एखाद्या इमारतीवर असेल तर अशा स्थितीत केवळ राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जातो, तर इतर सर्व ध्वज सामान्य उंचीवर राहतात.
असे म्हणतात की ही ब्रिटिश परंपरा आहे. १६१२ मध्ये एक ब्रिटिश जहाज आपल्या दिवंगत कप्तानाचा सन्मान करण्यासाठी ध्वज अर्ध्यावर घेऊन लंडनला परतले होते. तेव्हापासून ही पद्धत सुरु झाली.
आणखी एक सिद्धांतानुसार हे करण्यामागे आणखी एक कारण आहे. ब्रिटिश खलाशी प्रत्यक्षात मृत्यूचा ध्वज वर दिसावा म्हणून देशाचा ध्वज खाली करत होते. युनियन जॅक खाली करून तो रुंदीने कमी केला जातो. नंतर हे बदलत गेले. आता ब्रिटिश प्रोटोकॉल half-mast means the flag is flown two-thirds of the way up the flagpole”. म्हणजे ध्वज दोन-तृतियांश खाली होतो.
अमेरिकेत ही हा शिष्टाचार पाळला जातो. ध्वज अर्ध्यावर फडकवताना, प्रथम उंच फडकावा आणि नंतर खाली केला जातो. तो किती खाली असावा असा काही ठराविक नियम तिथे नाही.
ही माहिती तुम्हाला आवडल्यास जरूर शेयर करा.
शीतल दरंदळे

0 टिप्पण्या
No spam messages please