Ad Code

Responsive Advertisement

मुले युक्रेनमध्ये शिकायला का जातात

 नमस्कार मित्रानो, तुम्ही ऐकलेच असेल की युक्रेनमध्ये अनेक भारतीय विद्यार्थी अडकले आहेत, त्यांच्या सुटकेचे प्रयत्न चालू आहेत. काहीजण भारतात परतले आहेत. पण तरी परिस्थिती गंभीरच आहे. एकीकडे मुलांची सुटका झाली याबद्दल आनंद व्यक्त होत आहे, तर दुसरीकडे ही मुलं तिकडे गेलीच कशाला, यावर उलट सुलट चर्चा चालू आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो कि रशिया आणि युक्रेन हे असे देश आहेत जिथे भारतातील हजारो मुले दरवर्षी अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र शिकण्यासाठी जातात. भारतीय दूतावासानुसार, एकट्या युक्रेनमध्ये सुमारे 18,000 भारतीय विद्यार्थी आहेत जी तिथे शिकत आहेत. . स्टडी इंटरनॅशनलकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०११ ते २०२२ या कालावधीत भारत आणि इतर देशांमधून युक्रेनमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत ४२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मग आज आपण या व्हिडीओत समजून घेऊयात कि ही मुले युक्रेन मध्ये शिकायला का जातात ?

 

१. परवडणारे शिक्षण 

भारतामध्ये चांगले मार्क्स मिळूनही सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळणे सोपे नाही. मग डॉक्टर व्हायचे स्वप्न सोडून द्यायचे का असा प्रश्न पडतो. म्हणूनच विद्यार्थी खाजगी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यापेक्षा युक्रेन मध्ये शिक्षण घेण्याचा पर्याय निवडतात. या देशांमध्ये शिकवला जाणारा वैद्यकीय अभ्यासक्रम जागतिक दर्जाचा आहे. या विद्यापीठांना डब्ल्यूएचओ ची मान्यता आहे. युक्रेन मध्ये एमबीबीएसच्या शिक्षणासाठी केवळ १५ ते २५ लाख रुपये एवढा खर्च येतो, जो भारताच्या तुलनेत जवजवळ ५० टक्के कमी कमी आहे. . रशिया, युक्रेन, जर्मनी हे देश रास्त दरात उच्च दर्जाचं वैद्यकीय शिक्षण देण्यात आघाडीवर आहेत. त्यामुळे भारतच नाही तर नेपाळ, चीन, बांग्लादेश या देशातले विद्यार्थीही या विद्यापीठांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी जातात. तसेच इथे डोनेशन किंवा कॅपिटेशन फी ची गरज नसते. विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्याची प्रक्रिया अतिशय साधीसोपी, सरळ आहे. या प्रवेशासाठी टोफेल किंवा आयईएलटीएस यासारखी कोणतीही प्रवेश परीक्षा द्यावी लागत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे असलेल्या सुविधा आणि इन्फ्रास्ट्रक्चर उच्च दर्जाचं आहे. या महाविद्यालयांना संलग्न असलेल्या हॉस्पिटल्स मध्ये उत्तम दर्जाची यंत्रसामग्री असते आणि भरपूर रुग्ण हाताळायला मिळाल्याने चांगला अनुभवही मिळतो. इथली बहुतेक विद्यापीठं आपल्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या सुविधा देतात. यामध्ये अद्ययावत उपकरणं, प्रयोगशाळा, लायब्ररी यासारख्या सुविधांचा समावेश असतो. 



२. भारतात सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रेवेशासाठी स्पर्धा 

भारतामध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी स्पर्धा खूप जास्त आहे. परीक्षा देणाऱ्या साधारण 15 लाख विद्यार्थ्यांमध्ये केवळ 1 लाख विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळतो. म्हणजेच प्रवेश मिळवण्यासाठी 15 लाख विद्यार्थ्यांना पहिल्या एक लाख मुलांमध्ये आपले स्थान मिळवावे लागते. यापैकी सरकारी महाविद्यालयात प्रवेश मिळवणाऱ्यांची संख्या काही हजारात आहे. डिसेम्बर २१ च्या आकडेवारीनुसार देशात सरकारी आणि खासगी महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या एकूण 88120 जागा आहेत, तर बीडीएसच्या 27498 जागा आहेत.या जागांसाठी गेल्यावर्षी सुमारे आठ लाख मुलांनी परीक्षा दिली होती. 88 हजार जागांपैकी सुमारे 50 टक्के खासगी महाविद्यालयांत आहेत. त्यामुळं वैद्यकीय शिक्षणाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे दहा टक्के मुलांनाच हा प्रवेश मिळणं शक्य होतं. 

यामुळे अनेक विद्यार्थी युक्रेनच्या पर्यायाचा स्वीकार करतात.


3.युक्रेनच्या एमबीबीएस पदवीला भारतात मान्यता


हे सुद्धा एक महत्वाचे कारण आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी संबंधित विद्यापीठाला भारतीय मेडिकल काऊन्सिलची मान्यता मिळालेली असल्यामुळे विदेशात वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुलांना भारतात फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन (FMGE) द्यावी लागते. ती उत्तीर्ण झाल्यानंतर ते विद्यार्थी वैद्यकीय सेवा देऊ शकतात. त्यासाठी त्यांना परवाना मिळतो. ही परीक्षा ३०० गुणांची असते आणि उत्तीर्ण होण्यासाठी किमान 150 गुण आवश्यक असतात्.


कोणताही देश असला तरी शिकवण्याचं माध्यम इंग्रजी असतं.याचाही भारतीय विद्यार्थ्यांना बराच फायदा होतो. त्यांना त्या देशाची भाषा शिकावी लागत नाही. अर्थात तिथली स्थानिक भाषा शिकून घेण्याचे वेगळे फायदे असतात. पण ती येत नसेल तरीही त्यावाचून वैद्यकीय शिक्षण अडत नाही. तसेच तिथे उत्तम दर्जाच्या हॉस्टेलची सोय असते. . यापैकी अनेक ठिकाणी भारतीय पद्धतीचं जेवणही मिळतं. जेवण आणि राहण्याच्या सोयिसह एकूण खर्च सरासरी २५ ते ३५ लाखांच्या घरात होतो. जो इकडच्या मानाने कमीच आहे. परदेशातल्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांप्रमाणेच इतर देशांमधलेही विद्यार्थी असतात. त्यामुळे विविध देशांच्या संस्कृती आणि वैद्यकीय पार्श्वभूमीची ओळख होते. याचा फायदा परदेशात स्थिर होऊन वैद्यकीय प्रॅक्टिस करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना होतो. इकडे भारतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याने अनेक ठिकाणी भारतात आल्यानंतर द्यायच्या परीक्षेची तयारी सुद्धा करून घेतली जाते. त्यामुळे विद्यार्थी भारतात आल्यावर सहज परीक्षा उत्तीर्ण होऊन practice सुरू करू शकतात.


एवढे सगळे फायदे असतील तर विद्यार्थी युक्रेनला जाणार नाहीत का? जोवर आपल्याकडचं वैद्यकीय शिक्षण आणि महाविद्यालयं फी, सोयीसुविधा या बाबतीत या विद्यापीठांशी बरोबरी करत नाहीत तोवर हे चित्र असंच राहणार आहे. तुम्ही सांगा तुमचे मत काय आहे ? हा व्हिडीओ जास्तीतजास्त जणांपर्यंत जरुर पोहोचवा. ज्यामुळे त्यांना ही महिती होईल. तुम्ही या channel वर नवीन असाल तर like , subscribe करायला अजिबात विसरू नका. कमीतकमी ५० like ची आमची अपेक्षा आहे, त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळेल. भेटूया पुढच्या भागात .धन्यवाद

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या