Ad Code

Responsive Advertisement

तुम्ही चीनी फोन वापरताय?

 नमस्कार मित्रानो,

तुम्ही सगळेजण स्मार्ट फोन वापरत असालच. भारतात कितीतरी वेगवेगळे ब्रँडचे फोन आहेत. दुकानात म्हणा किंवा online खरेदी करताना आपण ब्रँडचा खूप विचार करतो. गेले काही वर्ष 'चीनचे फोन नको' असा सूर दिसत आहे, म्हणून madeinindia फोन कुठले आहेत हे आपण बघतो. सध्या Oppo, Realme, Vivo, OnePlus या चार ब्रँडला खूप मागणी आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का, ,हे चारही फोन एकाच कंपनीचे आहेत . या सर्व स्मार्टफोन ब्रँडची मूळ कंपनी बीबीके इलेक्ट्रॉनिक्स आहे. आणि तिचे मुख्यालय ग्वांगझो, चीन येथे आहे. आज आपण याबद्दलच सविस्तर माहिती करून घेऊयात. 


आधी BBK इलेक्ट्रॉनिक्स कंपनी बद्दल पाहूयात.


BBK Electronics ही कंपनी 1998 मध्ये सुरू झाली आणि तिचे मुख्यालय ग्वांगझो, चीन येथे आहे. बीबीके इलेक्ट्रॉनिक्सचे संस्थापक डुआन योंगपिंग हे चीनमधील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक आहेत. या कंपनीचे फक्त स्मार्टफोनच नाहीत तर इतर अनेक उत्पादने आहेत. यात स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, पॉवरबँक आणि होम थिएटरपासून ते ऑडिओ-व्हिज्युअल उपकरणांपर्यंत सगळ्या श्रेणी आहेत . या कंपन्यांचे जाळे जगभर पसरले आहे. २०२० च्या सर्वेक्षणानुसार ही चीनी इलेक्ट्रॉनिक्स कंपनी जगातील तिसरी सर्वात मोठी स्मार्टफोन उत्पादक कंपनी आहे. याच्या अनेक शाखा असल्याने एखादा ब्रँड कमी विकला जात असेल तर इतर ब्रँड ती तुट भरून काढतात आणि विक्रीचा समतोल राखला जातो.


भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये चिनी कंपन्यांचा वाटा सर्वात जास्त आहे आणि सर्वात मोठी बाजारपेठ सॅमसंग आणि शाओमीची आहे. पण सध्या BBK इलेक्ट्रॉनिक्सचे मार्केट शेअर Xiaomi पेक्षा जास्त आहे .


बाजारात BBK इलेक्ट्रॉनिक्सचे ब्रँड किती आहेत?


BBK इलेक्ट्रॉनिक्सचे Oppo, Realme, Vivo, OnePlus हे सर्व ब्रँड आहेत. म्हणजे आपण यापैकी कुठलाही ब्रँडचा फोन घेतला तरी तो BBK इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीचा असतो. पण विक्री करणारे हे सांगत नाहीत. 2014 मध्ये Oppo स्मार्टफोन अधिकृतपणे भारतात दाखल झाले. त्यांनी प्रीमियम दर्जाचे फोन लॉन्च केले.त्यावेळी स्पर्धा भरपूर होती. पण ५ वर्षात हे एक चांगले नाव झाले. Vivo ब्रँडची स्थापना 2009 मध्ये झाली. 2011 मध्ये त्यांनी त्यांचा पहिला स्मार्टफोन विकण्यास सुरुवात केली. OnePlus ची स्थापना 2013 मध्ये करणात आली होती. 2014 मध्ये Amazon द्वारे OnePlus One स्मार्टफोनची विक्री करून भारतात प्रवेश केला. OnePlus ब्रँडची आताही चांगली विक्री होत आहे. एकेकाळी भारतात सर्वाधिक विक्री होणारा फोन होता. Realme पहिल्यांदा 2010 मध्ये चीनमध्ये "Oppo Real" म्हणून दिसला. Oppo आणि Realme एकत्र काम करत होते. पण नंतर ते स्वतंत्र झाले. भारतात Oppo मे २०१८ मध्ये लॉन्च करण्यात आले. 


अमाझोन किंवा flipkart द्वारे हे सर्व फोन भारतात विक्री होण्यास सुरुवात झाली आणि नंतर ते शोरूममध्ये विक्रीस आले. जर तुम्ही बारकाईने पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की Oppo, Vivo,oneplus आणि Realme यांच्या फोनमध्ये बरेच साम्य आहे. फक्त त्यांचे डिझाईन,सॉफ्टवेअर आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजी मध्ये फरक असतो. या सर्व फोनचे उत्पादन नोएडा, उत्तर प्रदेश येथे होते आणि तिथे OPPO मोबाईल फॅक्टरी OnePlus फोन सुद्धा बनवते. याचा अर्थ एकाच कल्पनेवर सर्व ब्रँड छोटेसे बदल करून उत्पादने लाँच करू शकतात. बाकी त्यांचे आतले भाग सगळे सारखे आहेत. ते सगळे चीनमध्ये बनतात.


BBK इलेक्ट्रॉनिक्स सारखेच Xiaomi आणि Huawei सारख्या कंपन्या देखील Poco आणि Honor सारखे ब्रँड घेऊन आल्या आहेत. BBK इलेक्ट्रॉनिक्सची स्पर्धा Apple, Samsung आणि Huawei सारख्या कंपन्यांशी आहे. या कंपन्या आपले नाव ब्रँड म्हणून वापरतात तर BBK कुठेही आपले नाव वापरात नाही त्यामुळे बर्याच जणांना हे ब्रँड वेगवेगळे आहे असे वाटतात. पण हे फोन केला आपण विकत घेतो तेव्हा हा पैसा BBK लाच जातो.


भारतीय कंपन्या कुठल्या आहेत ज्या स्मार्ट फोन बनवतात ?


मित्रांनो तुम्हाला आता ही नावे सांगणार आहोत, जी चीनी स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्यांना टक्कर देतात. ती नवे आहेत Micromax , Jio, Intex Mobile, Lava Mobiles, Karbonn Mobiles. या सर्व कंपन्या भारतीय आहेत. यांचेही बरेच वैशिष्ट्य असणारे फोन आहेत. अनेकजण या कंपन्याचे फोन घेण्यासही पसंती देतात. या फोनची किंमतही बर्याचदा कमी असते.


आता आम्हाला कॉमेंट करून सांगा की तुम्ही स्वतः कोणत्या ब्रँडचा स्मार्टफोन वापरता ? तुम्हाला चीनी कंपनीचा फोन वापरायचा नसेल तर तुम्ही कुठल्या ब्रँडला पसंती द्याल ? ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे न विसरता आम्हाला कळवत जा ...धन्यवाद

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या