जुनी वृत्तपत्रे पिवळी का पडतात? इथे उत्तर वाचा!!
तुम्ही जुनी वृत्तपत्रे रद्दीत देत असाल. तेव्हा एक निरीक्षण केलेत का, काही वृत्तपत्रे ही पिवळी पडलेली असतात. म्हणजे पूर्ण गठ्ठा पाहिल्यास काही वृत्तपत्रे पांढरी तर काही पिवळी दिसत असतात. हे असे का होत असावे? वृत्तपत्रांचा कागद कालांतराने पिवळा का पडतो, याचे कारण तुम्हाला या लेखात मिळेल.
कुठल्याही गोष्टीची रंग बदलणारी प्रक्रिया ही ऑक्सिडेशन मुळे होत असते. म्हणजे कापलेले सफरचंद तपकिरी होते याचे कारण ऑक्सिडेशन प्रक्रिया. पण कागद तर लाकडापासून बनवला जातो. लाकडात सेल्युलोज आणि लिग्निन असे दोन पदार्थ असतात. जेव्हा लिग्निनमध्ये आढळणारे क्रोमोफोर्स ( म्हणजे रंग बदलास कारणीभूत असणारे रेणू) हवा आणि सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येतात तेव्हा लिग्निनचे रेणू कमी स्थिर(less stable) होतात आणि जास्त प्रमाणात प्रकाश शोषून घेतात. जास्त प्रमाणात प्रकाश शोषून घेतल्यामुळे पांढरा रंग पिवळा होतो.
आता तुम्हाला प्रश्न पडेल की इतर कागद इतक्या लवकर पिवळे का पडत नाहीत? कारण वर्तमानपत्रांची छपाई रोजच्या रोज होते आणि त्यांची किंमत ही कमी असते. त्यामुळे लाकडाचे लिग्निन फिल्टर केले जात नाही. यामुळे खूप मोठ्या प्रमाणात छपाईच्या खर्चात बचत होते.
वर्तमानपत्रे पिवळी पडू नये असे वाटत असेल तर सोपा उपाय आहे तो म्हणजे वर्तमानपत्रे सूर्यप्रकाशापासून दूर ठेवणे किंवा आम्ल-मुक्त बफर बॉक्समध्ये संग्रहित करणे. बंद कपाटात ती पिवळी पडत नाहीत आणि उघड्यावर ठेवल्यास काही काळाने रंग बदलतोच.
ही माहिती आवडल्यास जरूर शेयर करा.
शीतल दरंदळे

0 टिप्पण्या
No spam messages please