नमस्कार मित्रानो, याहू या इंटरनेट कंपनीचे नाव तुम्ही ऐकले असेलच. आजपासून सुमारे २१ वर्षांपूर्वी, याहू हे इंटरनेटचे दुसरे नाव होते. याहू हे जगातील सर्वात मोठे सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म होते. कदाचित हा व्हिडीओ ऐकणार्या बर्याच जणांनी आपले पहिले ई-मेल खाते देखील Yahoo वर तयार केले असावे. अनेकांनी Yahoo Chatrooms आणि Yahoo Messenger हे chatting करण्यासाठी वापरले असेल. पण, आता याहु फक्त आठवणीत उरले आहे. एवढी मोठी कपनी अपयशी होण्याचे कारण काय असावे ? आज या व्हीडीओत आपण याहू ची यशोगाथा आणि त्यानंतर झालेली पडझड याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. त्यामुळे हा व्हीडीओ शेवटपर्यंत पहा.
आधी पाहूयात याहू हे काय आहे?
याहू हे एक सर्च इंजिन आहे ज्यावर याहू सर्च इंजिन, कॅलेंडर, न्यूज, इमेजेस, फायनान्स, गॅझेट, रिअल स्टेट, याहू मेल, संगीत, खेळ, चित्रपट आणि बरेच काही शोधले जाऊ शकते. Yahoo चे फुल फॉर्म "Yet Other Hierarchical Officious Oracle" असा आहे.
याहूची स्थापना कोणी केली ?
जानेवारी १९९४ मध्ये स्टेनफोर्ड यूनिवर्सिटीचे दोन विद्यार्थी जेरी यांग आणि डेव्हिड फिलो यांनी Jerry'S Guide To The World Wide Web नावाची कंपनी स्थापन केली होती. त्यानंतर ३ महिन्यांनी तिचे नाव बदलून Yahoo असे करण्यात आले. इंटरनेट वापरणर्यांसाठी याहू हे एक जादूच्या पिटार्यासारखे होते. कारण सगळी माहिती आणि अनेक मनोरंजक गोष्टी एकाच ठिकाणी मिळत होत्या. पुढच्या काही वर्षांतच Yahoo ही जगातील सर्वात यशस्वी इंटरनेट कंपनी बनली. त्यांचे मुख्य ऑफिस कालीफोर्निया येथे आहे .
याहू अपयशी का झाली ?
याहूच्या अपयशाचे अनेक कारणे आहेत. पण यात मुख्य कारण म्हणजे एकाच वेळी अनेक प्रकारचे व्यवसाय सुरू करून याहू खूप यशस्वी बनली , परंतु ही कंपनी कोणत्याही एका कामात आपले कौशल्य सिद्ध करू शकली नाही. तसेच काळानुसार बदलली नाही. इंग्रजीत म्हणआहे “ जॅक ऑफ all ट्रेड्स मास्टर ऑफ नन” म्हणजेच ज्याच्याकडे खूप काम आहे पण तो कोणत्याही एका कामात तज्ञ नाही. याहूवरही ही म्हण अगदी चपखल बसते. आज,अमेरिकेची मोठी टेलिकॉम कंपनी वेरिझॉनने याहूला सुमारे 32 हजार कोटींना विकत घेतले आहे. तर २००० साली याहूचे मूल्य 125 अब्ज डॉलर म्हणजेच आठ लाख 30 हजार कोटी रुपये होते.
याहुने गुगल खरेदी करायची ऑफर नाकारली
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की 2002 मध्ये याहूने जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या गुगलला खरेदी करण्यासाठी 3 अब्ज डॉलर्स म्हणजेच 20 हजार कोटींची ऑफर दिली होती. पण गुगलने याहूकडून 5 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 33 हजार कोटी रुपये मागितले होते. याहूने तो मान्य केला नाही आणि हा करार तुटला. त्यानंतर याहूने गुगलला खरेदी करण्यास नकार दिला.
याहूने फेसबुक विकत घेण्याची संधीही गमावली
गुगलला नाकारल्यावर 2006 मध्ये याहूला फेसबुक विकत घेण्याची संधी मिळाली होती. परंतु याहूने फेसबुकचे मोल तेव्हा ओळखले नाही. त्यांनी फेसबुक ला नाकारले.
याहूने मायक्रोसॉफ्टची ऑफरही फेटाळली
याशिवाय 2008 मध्ये मायक्रोसॉफ्टने याहूला $44 बिलियन म्हणजेच सुमारे 2 लाख 95 हजार कोटींना विकत घेण्याची ऑफर दिली होती, परंतु याहूने ही ऑफरही नाकारली. कारण त्यांना ती किमत खूप कमी वाटली. आणि आज याहू 2008 पेक्षा 9 पट कमी किमतीत म्हणजे फक्त 32 हजार कोटीत विकले गेले आहे .
तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की आज केवळ 32 हजार कोटींना विकली जाणारी Yahoo ही Google आणि Facebook पेक्षा खूपच छोटी कंपनी बनली आहे. एकेकाळी याहूला या दोन्ही कंपन्या विकत घ्यायच्या होत्या. पण तेव्हा चुकीचे निर्णय घेतले गेले. आज गुगलची ब्रँड व्हॅल्यू Yahoo पेक्षा 46 पट जास्त आहे. सध्या गुगलची ब्रँड व्हॅल्यू 20750 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 15.5 लाख कोटी रुपये आहे. तसेच Facebook ची ब्रँड व्हॅल्यूही खूप जास्त आहे.
याहूच्या पडझडीला याहूच्या सीईओ मारिसा मेयर याही जबाबदार मानल्या जातात.त्या २०१२ मध्ये याहूमध्ये रुजू झाल्या होत्या. मेरिसाच्या कार्यकाळात याहूला 2015 मध्ये 30 हजार कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले होते. तसेच आणखी मोठे कारण म्हणजे याहूमध्ये उत्तम नेतृत्वाचा अभाव. याहूमध्ये गेल्या 21 वर्षांत सात मुख्य कार्यकारी अधिकारी बदलण्यात आले आहेत.
2000 नंतर इंटरनेटचे जग झपाट्याने बदलू लागले पण याहूने स्वत:ला काळाबरोबर बदलले नाही आणि ज्या वेळी इंटरनेट कंपन्यांनी सोशल मीडिया आणि मोबाईल फोनची ताकद ओळखून आपल्या ग्राहकांना नवीन प्लॅटफॉर्म देऊ करणे सुरू केले.पण याहू ने यातले काहीही केले नाही. इतरांना छोटे समजण्याची चूक याहूला चांगलीच महागात पडली.
मित्रानो तुम्हाला यातून नक्कीच समजले असेल की तुम्ही कितीही यशस्वी असाल पण काळानुसार आपल्या व्यवसायात बदल केले पाहिजेत तरच कोणताही व्यवसाय तग धरु शकतो . तुमची याबद्दलची मत आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडीओ आवडला तर like बटन दाबायला विसरु नका. हा व्हिडीओ जास्तीजास्त जणापर्यंत पोहोचवण्यास शेयर जरूर करा. आणखी माहितीपर व्हिडीओ पहायला भेटूया पुढच्या भागात , धन्यवाद

0 टिप्पण्या
No spam messages please