Ad Code

Responsive Advertisement

Who is Volodymyr Zelenskyy

 

Who is Volodymyr Zelenskyy


Brief history of current Ukraine president and how an actor/comedian


नमस्कार मंडळी, सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये भीषण युद्ध चालू आहे. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याबद्दल तुम्ही बऱ्याचदा ऐकले असेलच. पण यूक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? युद्ध सुरू असताना कोणत्याही राष्ट्राचे प्रमुख यांची भूमिका फार महत्वाची असते. युक्रेनच्या प्रमुखांचे म्हणजे व्होलोदिमिर झेलेन्स्की यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ते ज्या प्रकारे बलाढ्य रशियापुढे लढा देत आहेत तो अतिशय कौतुकास्पद आहे. ते म्हणतात की शेवटच्या श्वासापर्यंत लढा देऊ परंतु हार मानणार नाही. आज आपण रशियापुढं नतमस्तक न होणाऱ्या व्होलोदिमिर झेलेन्स्की यांचा प्रेरणादायी प्रवासाची माहिती करून घेणार आहोत. एक कॉमेडियन ते राष्ट्राध्यक्ष असा त्यांचा जीवनप्रवास खरोखर थक्क करणारा आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहायला विसरू नका.


व्होलोदिमिर झेलेन्स्की यांचे बालपण आणि शिक्षण कसे झाले हे समजून घेऊयात..


व्होलोदिमिर झेलेन्स्की यांचा जन्म २५ जानेवारी १९७८ साली युक्रेनच्या क्रिवी रिह येथे झाला. त्यांचे वडील अलेक्झांडर झेलेन्स्की क्रिवी रिह इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स येथे सायबरनेटिक्स आणि कॉम्प्युटिंग हार्डवेअर विभागाचे प्रमुख आणि प्राध्यापक होते. त्याची आई रिम्मा इंजिनिअर होती. झेलेन्स्की यांनी क्रिवी रिह इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्समधून २००० साली कायद्याची पदवी घेतली आहे. 



व्होलोदिमिर झेलेन्स्की हे त्यांच्या कॉमेडी शैलीसाठी प्रसिद्ध होते. शिक्षण घेत असतानाच त्यांना जाणवले की ते चांगली कॉमेडी करू शकतात.राजकारणात येण्याआधी झेलेन्स्की स्टॅंडअप कॉमेडियन म्हणून काम करायचे.1997 मध्ये वोलोदिमीर यांनी काही अभिनेत्यासोबत एकत्र येऊन ‘क्वार्टल 95’ नावाचा एक कॉमेडी ग्रुप बनवला. तो खूप लोकप्रिय झाला. त्यातून प्रेरणा घेत त्यांनी 2003 मध्ये त्यांनी स्वतःचे कार्यक्रम सुरू केले.त्यांना लवकरच युनायटेड युक्रेनियन संघ 'झापोरिझिया-क्रिवी रिह-ट्रान्झिट'मध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले गेले. त्यात १९९७ साली त्यांनी के मेजर लीगमध्ये काम करून जिंकले. २००८ साली त्यांनी 'लव्ह इन द बिग सिटी', त्याचा सिक्वेल 'लव्ह इन द बिग सिटी 2' या चित्रपटात काम केले. २०११ मध्ये 'अवर टाईम' या चित्रपटातही काम केले.


एक कॉमेडियन ते राष्ट्रपती कसे झाले हे आता पाहूया


 Servant of the People या टिव्ही शो मुळे त्यांचे आयुष्य बदलले. हा शो २०१५ ते २०१९ या काळात शो युक्रेनमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरला. या कार्यक्रमात झेलेन्स्कींनी राष्ट्रपतीची भूमिका केली होती. या भूमिकेत ते भ्रष्ट्राचाराविरोधात आवाज उठवतात, त्यांचे भ्रष्टाराचाविरोधातील भाषण प्रचंड व्हायरल होते आणि त्यातून त्यांची राष्ट्रपती पदासाठी निवड होते, असे दाखवले होते. हा शो लोकांना प्रचंड आवडला. त्यामुळे कॉमेडियन अभिनेता व्होलोदिमिर झेलेन्स्की यांना देशाच्या राजकारणात यावे लागले. त्यांनी त्याच शो चे नाव घेऊन पार्टी बनवली.2018 मध्ये वोलोदिमीर यांनी राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण केले. वोलोदिमीर यांनी ‘सर्वेंट ऑफ द पीपल पार्टी’ बनवली.या पक्षातून त्यांनी राष्‍ट्रपती पदासाठी निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत त्यांची भाषण लोकांना अतिशय आवडली. आणि तब्बल 73 % वोट मिळवून त्यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला . अश्याप्रकरे ते युक्रेनच्या प्रमुखपदी विराजमान झाले. 


झेलेन्स्की यांच्या कुटुंबात कोण आहे हे पाहून घ्या..


व्होलोदिमिर झेलेन्स्की यांचा विवाह 6 सप्टेंबर 2003 रोजी त्यांची मैत्रीण ओलेनाशी झाला.ओलेना पेशाने एक आर्किटेक्‍ट आणि स्‍क्रीन राइटर आहे. त्यांना सामाजिक कार्यात विशेष आवड असल्याने त्यांची समाजसेविका म्हणून देखील ओळख आहे. कोरोना महामारी दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी केलेल्या अनेक मदतकार्याबद्दल त्यांचे खूप कौतुक सुद्धा झाले. जेलेंस्की आणि त्यांची पत्‍नी ओलेना यांना दोन मुले आहेत.एक मुलगा आणि एक मुलगी. मुलाचे नाव किरिलो आणि मुलीचे नाव ऑलेक्‍जेंड्रा आहे. 


सध्याच्या उद्भवलेल्या परिस्थितीत त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा टार्गेट केले जाईल अशी भीती त्यांनी एका व्हिडिओमध्ये व्यक्त केली आहे. कोणतीही राजकारणाचा अनुभव नसताना झेलेन्स्की हे राजकारणात आले. आज ते त्यांच्यापेक्षा वयाने आणि अनुभवांनी मोठे असलेल्या पुतीन यांच्याशी लढा देत आहेत. येणारा काळ ठरवेल की त्यांचा लढा कसा निर्णायक ठरतो. परंतु सध्यातरी युक्रेन अध्यक्ष झेलेन्स्की यांच्या लढ्याविष्यी जोरदार चर्चा होत आहे. 


तुम्हाला व्होलोदिमिर झेलेन्स्की यांची भूमिका कशी वाटते? एक राष्ट्रप्रमुख म्हणून ते ज्या प्रकारे युक्रेनकडून निर्णय घेऊन लढा देत आहेत याबद्दल तुमचे मत जरूर कॉमेंट करून सांगा.


मित्रानो तुम्ही दिलेल्या लाईक्स आणि शेयर मुळे आम्ही असेच नवनवीन मनोरंजक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ. त्याचे notification तुम्हाला चॅनलला subscribe केल्यावर मिळेलच. अजूनपर्यंत लाईक्स, आणि subscribe केले नसेल तर लगेचच करा.आणि महत्वाचे म्हणजे ही माहिती सगळ्यांपर्यंत शेअर करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या