तुम्ही कधीकधी गडबडीत चुकीच्या व्यक्तीला ईमेल पाठवता. मग नंतर वाटतं जसं इतरठिकाणी Undo करुन आपण चूक दुरुस्त करू शकतो, तसं हे चुकीचे email परत रिकॉल करता आले असते तर? आता WhatsApp वर एखादा मेसेज चुकून सेंड केला तर तो डिलीट करण्याची सोय असते. पूर्वी हे फीचर नव्हते. तसंच जीमेलवरही चुकून पाठवलेला ईमेल undo किंवा डिलीट करता येतो.
अहं, फीचर नवं नाही, बरीच वर्षं जुनं आहे. फक्त सर्वांना माहित नाही, म्हणून हा लेखनप्रपंच!! Gmail वेबवर वापरत असाल तर ही सोय उपलब्ध आहेच. पण आता ती iOS साठी उपलब्ध आहे आणि अँड्रॉइड युजरसाठी देखील ही सोय लवकरच येणार आहे. त्यामुळे Gmail वरून पाठवलेले ईमेल कसे परत रिकॉल करायचे आणि अनसेंड कसे करायचे ते आज जाणून घ्या.
सर्वप्रथम स्मार्टफोन किंवा संगणकावर आपलं जीमेल अकाऊंट ओपन करा.
लॉग इन केल्यानंतर अकाऊंटच्या वर उजव्या बाजूला कॉर्नरवर सेटींग ऑप्शनमध्ये जा. मग all setting करून स्क्रोल डाऊन करा.
तिथे ‘Undo Send’ चा एक पर्याय दिसेल.
‘Undo Send’ समोर ५,१०,२० किंवा ३० सेकंद असा वेळ निवडण्याचा पर्याय निवडा.
सेटींगमध्ये बदल केल्यानंतर खाली ते सेव्ह करा.
ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जेव्हा ईमेल पाठवला जाईल तेव्हा तो काही सेकंदासाठी सेव्ह होतो. तसेच स्क्रिनवर मेल पाठवल्यानंतर तो ईमेल Undo करण्यासाठी एक ऑप्शन दिसतो.
या स्टेप्स करून तुम्हाला हे फीचर वापरता येते..हे वैशिष्ट्य आधीपासून by default ५ सेकंद असते . यामुळे समजा तुम्ही ईमेल पाठविल्यानंतर तो परत तपासून पाहू शकता आणि जर तुम्हाला ईमेलमध्ये काही बदल करायचे असतील तर तेही ताबडतोब करू शकता. iOS मध्येही setting मध्ये जाऊन याच स्टेप्स करू शकता आणि जीमेलवरून मेल पाठवताना झालेली चूक सुधारू शकता.
माहिती आवडल्यास शेयर करायला विसरु नका.
शीतल दरंदळे

0 टिप्पण्या
No spam messages please