Top Bollywood star earning from Instagram
इंस्टाग्राम हे ॲप फोटो किंवा व्हिडीओ अपलोड करण्यासाठी आहे हे आपल्याला माहितीच आहे. पण २०१० नंतर इंस्टाग्रामची लोकप्रियता इतकी वाढली की हे सर्वात लोकप्रिय जागतिक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक बनले आहे. जगात सगळे तरुण तरुणी इंस्टाग्राम वापरतात. मग याचा उपयोग सेलिब्रिटी स्वतःची लोकप्रियता वाढवण्यासाठी करणार हे ओघानेच आले. आपले बॉलिवूड सेलिब्रिटीही यातून फक्त लोकप्रियताच नाही तर कोट्यवधी रुपये कमवत आहेत. सेलिब्रिटी पोस्ट टाकत त्यांच्या चाहत्यांना गुंतवून ठेवतात. त्यामुळे त्यांचे फॉलॉवर वाढतात. जितके फॉलॉवर जास्त, तितके मोठमोठे ब्रँड त्यांना प्रचार करण्यासाठी पैसे देतात.दीपिका पदुकोण, शाहरुख खान यांसारखे अभिनेते सोशल मीडियाच्या माध्यमातून ब्रँडची जाहिरात करून कोट्यवधी रुपये कमवत आहेत. आज आपण इंस्टाग्रामवरून सर्वाधिक कमाई करणारे बॉलिवूड सेलिब्रिटी कोणते आहेत ते पाहुयात.
प्रियांका चोप्रा
बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हॉलिवूडला गेल्यापासून ती आता जागतिक स्तरावर एक स्टार आयकॉन झाली आहे. इंस्टाग्रामवर तिचे ७३ मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्ससह आहेत. ती इंस्टाग्रामवरील सर्वात श्रीमंत बॉलिवूड सेलिब्रिटी म्हणून ओळखली जाते. प्रत्येक ब्रँडची जाहिरात करण्यासाठी पोस्टला ती अंदाजे १.८ कोटी शुल्क आकारते.
आलिया भट्ट
महेश भट्टची मुलगी, एवढीच ओळख न ठेवता आलियाने आपल्या अभिनयाने स्वतःला आघाडीची अभिनेत्री म्हणून सिध्द केले आहे. आताच्या काळाचे सर्व आघाडीचे चित्रपट तिच्या खिशात आहेत. त्यामुळे इंस्टाग्रामवर तिचे फॉलोअर्स कमी नाहीत. ५८ मिलियनहून अधिक फॉलोअर्ससह आलियाचा मोठा चाहता वर्ग आहे. प्रत्येक पोस्टसाठी ती अंदाजे १ कोटी रुपये आकारते.
शाहरुख खान
शाहरुख खानला बॉलिवूडचा म्हणून ओळखले जाते. सध्या जरी त्याचे चित्रपट फारसे चालत नसले तरी त्याची लोकप्रियता थोडीही कमी झाली नाहीये. फक्त भारतात नाही तर जगभर त्याचे चाहते आहेत. त्याचे २७ मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.प्रत्येक ब्रँड एंडोर्समेंटसाठी तो अंदाजे ₹८० लाख ते ₹१ कोटी रुपये आकारतो.
दीपिका पदुकोण
दीपिका पदुकोण ही बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. तिच्या सौंदर्याचे आणि अभिनयाचे चाहते लाखो आहेत. तीचे सध्या इंस्टाग्रामवर 64 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. ती ब्रँडसाठी करत असलेल्या प्रत्येक पोस्टसाठी ₹१.५कोटी पेक्षा जास्त शुल्क आकारते.
अक्षय कुमार
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. त्याचे चित्रपट ज्या वेगाने तो करतो तेवढ्याच वेगाने त्याचे इंस्टाग्रामवर फॉलोअर्सही वाढतात. अनेक ब्रँडच्या जाहिराती त्याच्याकडे आहेत.त्याचे ५९ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि प्रत्येक ब्रँड पोस्टसाठी तो अंदाजे ₹१ कोटी कमावतो.
अमिताभ बच्चन
बिग बी चे इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोवर्स नाहीत. परंतु बॉलिवूड त्यांच्या नावाशिवाय पूर्ण होणार नाही. गेली अनेक दशके ते बॉलिवूडवर राज्य करत आहेत. या वयातही त्यांचे
२७ मिलियन फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवर प्रत्येक ब्रँड पोस्टसाठी ते ५० लाख रुपये घेतात. भारतातले जवळजवळ सर्व ब्रँड जाहिराती ते करतात.
इंस्टाग्रामवर सेलिब्रिटीच नाहीत तर सामान्य लोकही लोकप्रिय झालेले आहेत. त्यामुळे अनेकांसाठी हे उत्पन्नाचे चांगले साधन झालेले आहे.

0 टिप्पण्या
No spam messages please