Ad Code

Responsive Advertisement

तिसरे महायुद्ध नको

 मित्रानो , आज आम्ही सर्वात महत्वाच्या आणि ज्वलंत विषयावर बोलणार आहोत. तुम्ही टीव्हीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी 24 फेब्रुवारीला युक्रेनवर हल्ला केल्याची बातमी पाहिलीच असेल. रशिया आणि युक्रेनमधील वाद इतका शिगेला पोहचला की अखेर युद्ध सुरु झाले. रशियाने युक्रेनमधील जवळजवळ 11 शहरांवर हल्ले करुन तेथील लष्करी ठिकाणे उद्धवस्त केले. रशियन हल्ल्यात अनेक युक्रेनियन लोक मारले गेले आहेत. ही तर या फक्त सुरुवात झाली आहे. या युद्धाची भीषणता सोशल मीडियावरील अनेक व्हिडिओंमध्ये तुम्हाला पाहायला मिळत असेल. हे युद्ध म्हणजे जगावर तिसऱ्या महायुद्धाचे सावट आहे का ? यावर चर्चा सुरु झाली आहे. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण हीच प्रार्थना करत आहे की तिसरे महायुद्ध नको. कारण पहिल्या दोन महायुद्धांचा परिणाम इतका वाईट होता की त्यानंतर अनेक पिध्याना त्याचा त्रास भोगावा लागला. आज या व्हीडीओत आपण समजून घेऊयात कि तिसरे महायुद्ध का नको ? पहिल्या दोन महायुद्धांची कारणे आणि त्याचे परिणाम. त्यामुळे हा व्हीडीओ शेवट पर्यंत आवर्जून पहा  


आधी तिसरे महायुद्ध का नको हे समजून घेऊयात 


जगाला कोरोनाच्या काळामुळे आधीच सर्वात मोठ्या आर्थिक मंदीचा सामना करावा लागला आहे. अनेकांच्या नोकर्या गेल्या , धंदे बसले. यात फक्त वैयक्तिक नुकसान नाही तर देशाची आर्थिक परिस्थिती ही खिळखिळी झाली आहे. युरोपला त्याचा सर्वात जास्त फटका बसला आहे.तसेच सर्व राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था एकमेकांवर अवलबून आहेत. जसे की भारतात आपण मोबाईल फोन वापरतो पण त्याचे सुटे भाग चीन/तैवान येथे बनलेले असतात. तसेच भारत अमेरिकेला मोठ्या प्रमाणात औषधांची निर्यात करतो. औषधे बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल इतर देशांतून आयात केला जातो. अश्याप्रकारे सर्व देश व्यापारासाठी एकमेकांशी जोडले गेले आहेत. जर तिसरे महायुद्ध सुरु झाले तर या सगळ्या गोष्टी ठप्प होतील आणि महागाईचा भडका उडेल. एवढेच नाही, तर तिसरे महायुद्ध का नको याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मनुष्यहानी. आधीच्या दोन महायुद्धांच्या काळात संपूर्ण जगात कोट्यवधी लोकांचे मृत्यू तर झालेच पण जगावर अनेक दिवस उपासमारीची परिस्थिती निर्माण झाली होती.त्या परिस्थितीमुळे आता तिसऱ्या महायुद्धाला लोकही घाबरत आहेत. आता आपण पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांची कारणे जाणून घेणार आहोत.


पहिले महायुद्ध का झाले?- 


सुमारे 108 वर्षांपूर्वी, जून 1914 मध्ये २८ जून रोजी ऑस्ट्रियाच्या राजपदाचा वारस आर्चड्यूक फ्रान्सिस फर्डिनांड याची सर्बियात हत्या झाली. या खुनाच्या कारस्थानासाठी सर्बियास जबाबदार ठरवण्यात आले व ऑस्ट्रिया-हंगेरीने सर्बियावर आक्रमण केले. तेव्हा रशियन साम्राज्य सर्बियाच्या मदतीस धावून आले. प्रशियाने ऑस्ट्रियाचा पक्ष घेतला आणि बेल्जियम व फ्रान्सवर हल्ला केला. यामुळे ब्रिटिश साम्राज्याने प्रशियाविरुद्ध युद्ध पुकारले. हळूहळू अनेक देशांनी त्यात उडी घेतली आणि अशा प्रकारे दोन देशांच्या युद्धाचे रूपांतर पहिल्या महायुद्धात झाले. त्या लढ्यात जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, अमेरिका आदी देश सक्रिय होते. चार वर्षांच्या लढाईनंतर ११ नोव्हेंबर १९१८ रोजी जर्मनीच्या आत्मसमर्पणाने पहिले महायुद्ध संपले. २८ जून १९१९ रोजी जर्मनीने करारावर स्वाक्षरी केली, ज्यामध्ये त्यांना आपला मोठा हिस्सा गमवावा लागला होता.


आता पाहूयात पहिल्या महायुद्धाचे परिणाम काय होते ?


या युद्धाचे परिणाम भीषण होते. या युद्धामुळे प्रशियन साम्राज्य, ऑस्ट्रिया-हंगेरीयन साम्राज्य, ओस्मानी साम्राज्य व रशियन साम्राज्य ही साम्राज्ये नामशेष झाली. बेल्जियम व सर्बिया ही राष्ट्रांना भरपूर हानी पोहोचली होती. फ्रान्सचे १४ लाख सैनिक या युद्धात मृत्युमुखी पडले, रशिया व प्रशियाचे १५ लाखावर सैन्य मरण पावले.१९१४ ते १९१८ या काळात ८० लाख सैनिक युद्धात मृत्यू पावले, ७० लाख कायमचे जायबंदी झाले, तर १.५ कोटी सैनिक जखमी झाले. प्रशियातील १५.१%, ऑस्ट्रिया-हंगेरीतील १७.१% व फ्रान्समधील १०.५% पुरुष मृत्युमुखी पडले. ७,५०,००० प्रशियन नागरिक ब्रिटनने केलेल्या नाकाबंदीत उपासमारीने मेले. युद्धसमाप्तीच्या काळात १ लाख नागरिक लेबेनानमध्ये दुष्काळामुळे मृत्युमुखी पडले होते.


आता पाहूयात दुसऱ्या महायुद्धाचे कारण काय होते ?


पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीच्या २० वर्षांनंतर, जर्मन राष्ट्रीय समाजवादी (नाझीवाद) पक्षाचा नेता अॅडॉल्फ हिटलरने व्हर्सायचा करार रद्द करण्याची घोषणा केली.मार्च १९३८ मध्ये जर्मनी आणि ऑस्ट्रिया एकत्र आले आणि हिटलरच्या सैन्याने १९३९ मध्ये चेकोस्लोव्हाकियावर कब्जा केला. १ सप्टेंबर १९३९ रोजी जर्मन सैन्य पोलंडमध्ये दाखल झाले तेव्हा दुसरे महायुद्ध सुरू झाले. यानंतर जगाचे दोन भाग पडले. एकीकडे मित्र राष्ट्र होते ज्यात अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, सोव्हिएत युनियन यांचा समावेश होता तर दुसरीकडे जर्मनी, जपान आणि इटली यांचा समावेश असलेले राष्ट्र होते. जवळ जवळ ७० देशांचे सैन्य यात सहभागी झाले होते. हिटलरच्या सैन्याने नॉर्वे, डेन्मार्क, लक्झेंबर्ग, बेल्जियम, नेदरलँड आदी देश काबीज करायला सुरुवात केली. अचानक जर्मन सैन्यानेही सोव्हिएत संघाविरुद्ध युद्ध पुकारले. पण ,जर्मन सैनिक सोव्हिएत युनियनच्या सैन्यासमोर उभे राहू शकले नाहीत. हिटलरने ३० एप्रिल १९४५ रोजी आत्महत्या केली आणि ८ मे १९४५ रोजी जर्मनीने आत्मसमर्पण केले.जर्मनीने आत्मसमर्पण करुनही जपान यासाठी तयार नव्हता. त्यानंतर अमेरिकेने ६ ऑगस्ट १९४५ रोजी हिरोशिमा आणि ९ ऑगस्ट १९४५ रोजी नागासाकीवर अणुबॉम्बने हल्ला केला. जपानने बळजबरीने आत्मसमर्पण केले तेव्हा दुसरे महायुद्ध २ सप्टेंबर १९४५ रोजी संपले. या युद्धामध्ये दोस्त राष्ट्रांचा विजय झाला. या युद्धात सहा कोटींच्यावर माणसे मेली.  



दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम काय झाले ?


दुसऱ्या महायुद्धाने मानवी इतिहासात कधीही न पाहिलेली अतोनात हिंसा पाहिली. जगातील सर्वच राष्ट्रे यात भरडली गेली. काही युद्धग्रस्त होतेच तर काहींना त्याचे दूरगामी परिणाम भोगावे लागले. जर्मनी, पोलंड व रशिया व जपानमध्ये सर्वाधिक लोक बळी पडले. ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी व रशिया या देशांतील शहरेच्या शहरे हवाई हल्यांमध्ये संपूर्णपणे बेचिराख झाली. या देशांना पुढील अनेक दशके ती शहरे पुन्हा उभारण्यात घालवावी लागली. अनेक पिढ्या आजही याचे परिणाम भोगत आहेत.


मित्रानो तुम्हाला आज लक्षात आलेच असेल की महायुद्ध हे किती भयानक असते . फक्त लढणाऱ्या देशांनाच नाही तर इतर सर्व देशांवर त्याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे आपण प्रार्थना करूयात की हे युद्ध लववर संपेल. तुमचे काय मत आहे हे आम्हाला जरुर कळवा. तुमच्या likes मुळे आम्हाला नक्कीच प्रोत्साहन मिळत राहते. त्यामुळे ही माहिती like आणि share करायला विसरू नका . असेच महितीपर विडीओ पाहण्यासाठी आमचा channel subscribe करताय ना ? भेटूया पुढच्या भागात.

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या