लाईफपार्टनर भाग 10
********************************************
निमाची जाण्याची तयारी पाहून सुभाषची अख्खी रात्र तळमळत जाते. पहाटे फोन वाजतो बघतो तर कोकणातून आईचा फोन. तो लगेच फोन घेतो. पलिकडून आई सांगते,"बाबांना त्रास होतोय! ताबडतोब ये" सुभाष डिटेल्स विचारतो आणि काही सूचना देतो.
फोन ठेऊन तडक निमाच्या खोलीचे दार वाजवतो. निमा डोळे चोळत बाहेर येते,सुभाष आईच्या फोनबद्दल सांगतो. तिही काळजीत पडते. सुभाष तिला सांगतो मला लगेच निघावं लागेल. निमा सांगते तिही येणार आहे लगेच तयारी करते. सुभाषने तोपर्यंत हॉस्पिटलला फोन करून कळवलं तिथल्या assistant Dr ,आणि नर्सेसला योग्य त्या सूचना दिल्या .!माहिती दिली व तो कोकणात जात आहे असं सांगितलं.
निमाने खायचे काही पदार्थ डब्यात बांधून घेतले. स्वतःचे कपडे बॅग मध्ये टाकले. रोहन आणि सुभाषचे कपडेही भराभर बॅगमध्ये भरले. सुभाषने ड्राइव्हला तयार राहण्यासाठी सांगितले.
रामुकाकांनी गाडीत सगळे सामान भरले. निमाने रोहनला झोपेतच कडेवर घेतले आणि तिघे गाडीत बसले. सुभाष खूप टेन्शन मध्ये दिसत होता. निमाने त्याच्या हातावर हात ठेवला आणि डोळ्याने त्याला शांत राहण्यास सांगितले. रोहन तिच्या मांडीवर झोपला होता. तास दीड तासात त्याला जाग आली. त्याने निमाला विचारले आपण कुठे जात आहोत? तिने सांगितलं तेव्हा तो खूप खुश झाला आजी आजोबाकडे राहायचं म्हणून. आणि त्यात निमा सोबत होती मग तर त्याला अजून आनंद झाला. त्याने कोकणात काय काय गंमत करायची या सगळ्याच प्लॅनिंग केलं.
निमा त्याच्या गप्पा ऐकत त्याला भरवत होती. सुभाषच्या डोळ्यासमोर एकदम स्वरा आली. तिही कोकणात जाताना रोहनला अशीच भरवायची. रोहन खरंच किती लवकर adjust झालाय निमासोबत. त्याला खूप समाधान वाटले.
घर जवळ आलं होतं. सूर्योदयही झाला होता. स्वराने खिडकीतून बाहेर पाहिले. तिला सगळीकडे हिरवंगार दिसलं. नारळी,पोफळीच्या बागा,लाल माती,कौलारू टुमदार वाडे,काही छोटी घरं,आंबा,फणस सुपारीची झाडं. सायकलवर जाणारे अनेकजण. छोटे छोटे रस्ते,दुतर्फा वाडी,काटक बाया,माणसं वातावरण अगदी नयनरम्य दिसत होतं.
एका कौलारू घरासमोर गाडी थाम्बली. सुभाष तडक आता गेला. रोहन उतरल्यावर लगेच तो निमाला ओढत आत नेऊ लागला. निमाला दिसलं ते समोर तुळशी वृन्दावन त्यामागे एक अतिशय स्वच्छ अंगण. एक कौलारू लाल घर. मोठ्या दारासमोर भला मोठा झोपाळा. अंगणात बरेच नारळ ठेवले होते,जणू आताच झाडावरून उतरवले असावेत. इतक्यात आतून एक बाई भराभर येतात. सुभाषच्या आई नसतात कोणी दुसरंच,ती निमाला आणि रोहनला पाणी देते आणि आत यायला सांगते.
निमा आत येते. सुभाषचे बाबा एका खाटेवर पडलेले असतात. सुभाष त्यांना तपासत असतो. सुभाष ची आई कडेलाच उभी असते. रोहन लगेच आजीकडे धाव घेतो. सुभाष सांगतो bp वाढलाय बाबांचा,म्हणून त्रास झालाय. मी काही इंजेकॅशन आणि गोळ्या देतो लगेच बरं वाटेल. सुभाषच्या आईला हे ऐकून बरं वाटतं. सकाळी झालेला त्रास बघून ती अगदी घाबरी घुबरी होते. पूर्वी असं कधीच त्यांना त्रास झालेला नसतो.
थोडयावेळाने बाबांना झोप लागते आणि सगळे बाहेर येतात. सुभाषचे टेंशन उतरले असते तो आईला समजावतो. दुखणं किरकोळ असतं,आईचा चेहरा ही शांत होतो. सगळ्यांचं मनावरचं ओझं उतरलं. ती निमाला जवळ घेते,तिच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवते! आईला निमा आल्यामुळे अजून आधार वाटतो. रोहन तर पूर्ण घरभर फिरत असतो त्याला मावशीला अख्खा वाडा फिरवून दाखवायचा असतो. सगळ्यांना हसू येतं.
दुपारची जेवणं उरकल्यावर सगळें विश्रांती घेतात. सुभाष निमाला घरामागची वाडी फिरवून दाखवतो. तिला खूप आवडते. ती स्वयंपाक ही खूप आवडल्याचे सांगते,कोकणचा मेवाच वेगळा. सध्याकाळपर्यंत बाबांना बरे वाटते. ते सगळ्यांना बोलावून काही बोलायचे आहे असं सांगतात. सगळे येतात.
सुभाष - बाबा तुम्ही पडा आता..मी आलो आहे ना! आता ठणठणीत बरे झाले की तुम्ही आणि आई माझ्याबरोबर यायचं कायमचं मुंबईला,...
बाबा- सुभाष या निमित्तानं तू आलास रे! खरं तर स्वरा गेल्यापासून मला तुझीच आणि रोहनची काळजी लागून राहिलीय. आम्ही म्हातारे तुला कधीपर्यंत पुरणार? आज ऐक माझ आता पुढचा निर्णय घे आणि योग्य मुलीशी लग्न कर. माझे सगळे आजार पळून जातील बघ.
आई- खरं आहे रे! आम्ही म्हातारे काही त्या शहरात राहू शकणार नाही,जीव गुदमरतो आमचा. इथे लाल मातीतच आम्ही शेवटचा श्वास असेपर्यंत राहणार. तू आता आमचं ऐक. चार पावसाळे नक्कीच जास्त पाहिलेत आम्ही. स्वरालाही शांती मिळेल. तिचाही जीव अडकला असेलच तुमच्या काळजीने.
सुभाष- आईबाबा स्वराने मला स्वतः सांगितलं होतं,पण मन तयार होत नव्हतं. मी माझ्या दुःखात इतका गुरफटलेला होतो तेव्हा ठरवलं की फक्त कामात स्वतःला गुंतून ठेवायचं. पण आता कळलंय मला ,मी सर्वांचा विचार करायला हवाय. तुम्ही म्हणता ते योग्यच असेल.
आईबाबा खूप आनंदी दिसतात. बाबा तर लगेच उभे राहतात,बघ तुझ्यासाठी मी स्थळ शोधायला आता सुरुवात करतो. सगळे बाबांचा उत्साह पाहून अवाक होतात. आई लगेच आत जाऊन सुभाषची दृष्ट काढते. निमाला हे पाहून खूप भरून येतं. आईबाबांचं प्रेम किती निर्वाज, निरपेक्ष असतं हे तिला जाणवतं.
रात्री सर्वांची निजानीज झाल्यावर सुभाष बराच वेळ झोपाळा वर बसला असतो. निमाला आता सर्व कळायला हवे तिला आपल्या मनातील प्रेम सांगायचं ठरवतो.
निमा झोपाळ्याकडेच येत असते. सुभाष तिला पाहत असतो एकटक. ती जवळ येऊन उभी राहते. सुभाषची नजर हटत नाही.
निमा- किती सूंदर चांदणं पडलय ना! मोकळं आकाश खूप दिवसांनी पाहत आहे
सुभाष - चांदणं छानच पडलंय,पण चंद्र आता उगवलाय
निमा(आकाशाकडे पाहत)- नाही हो,आज चंद्रोदय उशिराच आहे वाटतंय..मला का नाही दिसत?
सुभाष- पण मला दिसतोय,अगदी माझ्या हातभार लांब.
निमा सुभाषकडे पाहते,त्याची नजर आपल्यावरच आहे हे कळल्यावर ती एकदम गडबडते,लाजते आणि तीची नजर आपोआप खाली जाते.
सुभाष तिच्या जवळ जाऊन तिच्या कानात कुजबुजतो"या चंद्राची सर्वच रूपं मोहक वाटतात,मी स्वतः अनुभवली आहेत,तो असला की शीतल चांदणं आणि नसला की भकास वाटतं."
निमा एकदम पुढे सरकते. सुभाष तिच्या मागे उभा राहतो
सुभाष - निमा,मला तुला काही सांगायचंय
निमा(लटकं हसत)- डॉक्टर कोकणात आल्यावर कवी झालेले दिसतायत, मला आता वेळ नाही मी जाते.
सुभाष- आता कुठे जाणार निमा? माझ्या नजरेने तुला घट्ट धरून ठेवलंय
सुभाष तिचा हात पकडायला जातो,निमा पटकन हसत खोलीच्या दिशेने पळत जाते. सुभाषला हसू येतं,तो अजूनही तसाच उभा असतो. निमा आत गेल्यावर दार बंद करून घेते. हृदयाची धडधड वाढली असते,सुभाष च बदलेले रूप तिला हवंहवंसं वाटतं. ती हळूच दार उघडून बघते. सुभाष तिथेच उभा असतो. दोघांची नजरानजर झाल्यावर दोघेही खळखळून हसतात.
त्यांच्या प्रेमाचं पांढरशुभ्र चांदणं अंगणभर पसरतं.
क्रमशः
© शीतल अजय दरंदळे


0 टिप्पण्या
No spam messages please