#लाईफपार्टनर भाग 5
*********************************
अचानक स्वराला पहाटे त्रास होऊ लागला. सुभाषने हॉस्पिटलमधून अँबुलन्सला कॉल केला. दहा मिनिटात अम्ब्युलन्स आली. निमा,सुभाष तिच्यासोबत हॉस्पिटलमध्ये गेले. सुभाषने तिथल्या नर्सेसला सगळ्या महत्वाच्या सूचना केल्या. स्वराला ICU त ऍडमिट करण्यात आले. Dr प्रशांत ही हजर झाले.
निमा बाहेर बसून होती. खूप टेन्शन आले होते तिला. आत काय चाललय? ती मनोमन देवाचा धावा करत होती. मध्येच उठून येरझाऱ्या घालत होती.
एक दीड तासाने सुभाष आणि Dr प्रशांत बाहेर आले. दोघेही काही बोलत होते.नर्सेसला पुढच्या सूचना देऊन झाल्यावर,दोघे केबिन मध्ये गेले. दहा मिनीटांनी निमालाही बोलवण्यात आले.
Dr प्रशांत बोलायला लागले, स्वरा खूप क्रिटिकल स्टेज ला आहे आता. May be we can do the last kemo but she may not respond to it. तिला अजूनच त्रास होऊ शकतो. सुभाष तुला माहीतच आहे ती कोमात ही जाऊ शकते.आता तिला ventillator वर ठेवता येईल. पण जास्तीत जास्त 1 day more. तुम्ही ठरवा. सुभाष be strong.
निमा- असा अचानक कसा त्रास झाला?कशी आहे ती आता?
सुभाष- तिने स्वतः ठरवलंय बहुदा.
निमा- म्हणजे?
सुभाष- ट्रीटमेंटसाठी ती रिस्पॉन्स देत नाहीये..तिला नको आहे आता काही.
निमा- हे बरोबर नाही तुम्ही समजवा ना तिला,
सुभाष- झालय बोलून.तिला थोडयावेळाने शुद्ध येईल मी बोलेल.पण तिने निश्चय केलेला दिसतोय. अवघड आहे.मी आईबाबा आणि रोहनला बोलावतो.
सुभाष फोन फिरवतो. ते निघण्याची तयारी करतात कोकणातून.
निमा -ताई 2 दिवसांपूर्वी बोलतच होती की तिला आता जाणवतंय,भास होतायेत कसले तरी..
इतके दिवस मनाची तयारी केली होती,पण जेव्हा प्रत्यक्ष वेळ येते तेव्हा असह्य वाटतं. आपल्या सर्वात जवळची व्यक्ती आता परत कधीच दिसणार नाही,बोलणार नाही ,आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग असलेली आता आयुष्यातून कमी होणार असं एकटं टाकून..........शांतता...पोखरून टाकणारी.... सुभाषच्या मनात वादळ उठले होते,न शमणारे,भरला संसार विझवणारे....
काही तासांनी स्वराला जाग येते सुभाष आत जातो.
सुभाष- स्वरा काय होतंय गं ,कशी आहेस?
स्वरा- मी ठीक आहे रे,मी घरी का नाही? हॉस्पिटलमध्ये कशी आले?
सुभाष पहाटे घडलेलं सगळं सांगतो.
स्वरा- हम्म,मला वाटत होतं की आता वेळ आलीये. मला आता काही नको केमो,मला सहन नाही होत रे. खूप त्रास होतोय,आता शक्ती संपली असं वाटतंय. मला सुखानं जाऊदे. परत नळ्या,injections, नको आता. किती वाढवणार ? उपयोग काय त्याचा?आजचं मरण उद्यावर. मला फक्त रोहनला भेटायचं आहे एकदा.
सुभाषचे डोळे पाणावतात -" स्वरा, तुला खरं तर हार मानू नको असं म्हणलं होतं ना मी? मग असं का बोलतेस?
निमा- तू डॉक्टर आहे ना रे?तुला सगळं खरं माहितेय. हार नाही मानली मी. पण खरं तर सत्य स्वीकारलय. तुही आता स्वीकार. स्वतःला सांभाळ,रोहन आई बाबांची काळजी घे.
सुभाष- अशी निरवानिरवीची भाषा का स्वरा?
स्वरा- मला हसत निरोप घेऊ दे रे.आणि तुही हे स्वीकार. त्रास होईलच. पण यात अडकून पडू नकोस. स्वतःच आयुष्य नव्याने सुरू कर. नविन लाईफपार्टनरचा विचार कर ,तिला स्वीकार.।अजून खूप आयुष्य आहे पुढे.
सुभाष- हे असं काही बोलू नकोस! मला शक्य नाही ते. इतक्या सहज बोलतेस तू.
स्वरा परत अस्वस्थ झाली. इतक्यात निमा आत आली.तिच्यामागे रोहन आई बाबा सगळेच आले.रोहन खूप बारीक चेहरा करून आत आला त्याने स्वराला त्याने मिठी मारली. बाबा रडत होते हे पाहून त्यालाही रडायला यायला लागले. स्वराने त्याला मिठीत घेतले आणि डोळे मिटले. कायमचे.
रोहन आई करत जोरात ओरडला,सुभाष ने स्वरा ची नाडी चेक केली. ठोके थांबले होते. सुभाष कोसळला.आईबाबा त्याला सावरण्याचा प्रयत्न करत होते.
एक अभद्र सत्य खरं झालं होतं. निमाने रोहन ला स्वतःकडे घेतले ती बाहेर आली. रोहन कितीतरी वेळ तिला मिठी मारून भेदरून गप्प बसला होता. निमाचे डोळे अखंड वाहत होते.
पुढची प्रोसेस वेगाने होत होती.आई आणि रोहनला Dr प्रशांत ने घरी थांबण्यास सांगितले. सुभाष बरोबर बाबा आणि निमा होतेच. बाबा Dr प्रशांत बरोबर सगळ्या फॉर्मलिटीएस पूर्ण करत होते.
सुभाष आतल्या केबिनमध्ये हताश बसला होता. एकटा,असह्य वेदना घेऊन,हतबल,भावशून्य नजर खिडकीबाहेर...कसलाही आवाज,चाहूल त्याला जाणवत नव्हती. निमा आत आली. त्याच्या खांद्यावर तिने हात ठेवला तो थोडं दचकला. तिने त्याच्या डोळ्यांत पाहिले ती अजून जवळ गेली त्याने तिच्या पोटाला घट्ट मिठी मारली आणि तो धाय मोकलून रडला. निमा त्याच्या डोक्यावरून,पाठीवरून फक्त हात फिरवत राहिली. दोघांचेही दुःख अश्रू बनून वाहत होते अखंड,कितीतरी वेळ...
©शीतल दरंदळे
क्रमशः


0 टिप्पण्या
No spam messages please