Ad Code

Responsive Advertisement

लाईफपार्टनर (भाग 3)

 #लाईफपार्टनर भाग 3


************************


पुढचा पूर्ण दिवस सुभाषचा हॉस्पिटलमध्येच गेला. स्वराची केमो प्रोसेस सुरू झाली होती. रोहन आणि  निमा घरीच होते. रोहन खूप हळवा झाला होता. आई, बाबा दोघेही हॉस्पिटलमध्ये असत. इथे निमाला तो अगदी चिकटून राहत होता. जणू काहीतरी अकल्पित घडतंय हे त्या कोवळ्या जीवाला कळलं होतं.

काही दिवसांनी स्वराला घेऊन सुभाष घरी आला. स्वरा खूप थकल्यासारखी वाटत होती. रोहनने आईबाबांना पळत जाऊन मिठी मारली.

रोहन - "तुम्ही मला एकट्याला का सोडून गेलात,मला पण यायचं होत ना?"

स्वरा - "रोहन आम्ही आलो ना तुझ्यासाठी एकदम लवकर? सॉरी..आता नाही जाणार कधीच.. तू सांग तू काय केलंस मावशीबरोबर?" 

रोहनने स्वराला दोन दिवसांचा सर्व वृतांत सांगितला. रोहन स्वराच्या गप्पा झाल्यावर सुभाष स्वराला खोलीत घेऊन गेला. तिचं खाणं आणि औषध झाल्यावर  स्वराला झोप आली. रोहनही जेवून तिथेच झोपला. मग सुभाषने त्याला आपल्या खोलीत नेलं. त्याला झोपवून तो बाहेर येऊन थोडावेळ टीव्ही पाहत बसला. निमाही आली.

निमा - " कशी आहे ताई?"

सुभाष- औषधांना चांगला प्रतिसाद देतेय. मी आधी घाबरलोच होतो, पण माझे सर Dr प्रवीण स्वराची केस हाताळत आहेत. He is very experienced and senior most, so I was relaxed.

निमा- वा छान! ताईची सगळी ट्रीटमेंट चांगली होईल.

सुभाष- हो,उद्या कॉन्सलर येतील, त्यांची ही तिला खूप मदत होईल. तिचे मनोबल अजून वाढेल.

निमा-तुम्ही कसे आहात?

सुभाष- मी छानच, स्वरा चांगला प्रतिसाद देतेय, एक डॉक्टर म्हणून मी खूषच असायला पाहिजे.


निमा- मग बोलण्यात जाणवत नाहीये तसं? आतला पार्टनर काय सांगतोय?


सुभाष- लाईफ पार्टनर हताश आहे निमा,तिला अस झुंजताना पाहून मी हतबल होतो.


निमा- हतबल,हताश हे शब्द मनोव्यथा अगदीं सहज प्रकट करतात. पण ते न सांगता ही तुमच्या चेहऱयावर स्पष्ट दिसतात. ताईला आपल्याला उभे करायचे आहे. आपल्याला समर्थ साथ द्यायला हवी. चेहऱ्यावर एकही नकरात्मक भावना न दर्शवता. हे  या परिस्थितीत अवघड नक्कीच आहे. पण जमवायला हवं! तिची अर्धी शक्ती तुम्हीच आहात.

सुभाष- होय,बरोबर बोललीस निमा. मी आहे उभा तिच्यासोबत कायम.


तेवढ्यात रोहन धावत येतो,  बाबा झोप येत नाहीये परत गोष्ट सांग ना.......


सुभाष (हसत)- येस,चल रोहन मी तुला आज एक शूर झाशीच्या राणीची गोष्ट सांगतो.

सुभाष रोहनला उचलून गुदगुल्या करतो आणि हसत हसत दोघे खोलीकडे जातात. निमा त्यांच्याकडे बघत राहते.

दुसऱ्या दिवशी सकाळीच सुभाषचे आईबाबा कोकणातून आले. सुभाषने त्यांना थोडी कल्पना दिली असते की स्वराला बरं नाही पण मुद्दाम सविस्तर सांगत नाही त्यांना उगीच टेन्शन नको म्हणून.

आल्यावर जेव्हा स्वराची परिस्थिती कळतं तेव्हा त्यांना धक्काच बसतो .सुभाषची आई तर रडायलाच लागते. सुभाषने आतापर्यंत का सगळं कळवलं नाही म्हणून त्याला त्याचे बाबा दरडावतात. आता सर्व नीट होईपर्यंत ते ही इथेच राहायचा निर्णय घेतात. सुभाष त्यांना सांगतो की इथे नका थांबू तुम्हाला जास्त टेन्शन येईल, पण ते ऐकत नाही. रोहन मात्र आजी आजोबांना पाहून खूप खुश होतो. आणलेला कोकणचा खाऊ तो खूप आवडीने खातो. आजी आजोबासोबत तो बाहेर जायचा हो हट्ट करतो. त्यांचा संध्याकाळचा बागेत जायचा प्लॅन ठरतो. वातावरण हलकं होतं.

स्वराला भेटायला सुभाषचे आईबाबा खोलीत येतात तेव्हा तिला खूप भरून येतं. ती पाया पडायला उठते तर सुभाषची आई तिला पडून राहण्यास सांगते. तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवून आई म्हटतात,तू लवकर बरी होशील बरं यातून,आता मी आले ना माझा नवस कधी वाया जात नाही. कोकणच्या गणपतीला नवस बोलते बघ, कसा ऐकणार नाही ? आपल्या घराण्याचा नवस्या गणपती आहे तो. खडखडीत बरी होशील तू.

सगळ्यांना हायसे वाटते. निमा स्वयंपाकघरात सगळी स्वयंपाकाची तयारी करत असते. सुभाषची आई पाहत असते,त्या दोघींची ओळखीची बोलणी होतात. सर्वजण जेवायला बसतात. आज खूप दिवसांनी स्वराही त्यांच्यात मिसळून जाते. गप्पा  होतात. बऱ्याच दिवसांनी घरात चैतन्य येतं. सुभाषचा चेहरा ही खुलतो.

रोहन, आजी व आजोबा बागेत जायला निघतात. सुभाष हॉस्पिटलमध्येच असतो. ड्रायव्हरला निमा सूचना देते. तिघे गाडीने बागेत जातात. निमा स्वरासोबत थांबते. स्वराचा आज खूप गप्पा मारायचा मूड असतो. दोघी बहिणी लहानपणीच्या गप्पा मारत बसतात.

रात्री सगळ्यांची जेवणं होऊन निजानीज झाली असते. रोहन आजी आजोबासोबत झोपून जातो.निमा सुभाष ची वाट पाहत बसते. रात्री उशिरा सुभाष येतो.


निमा- आज उशीर झाला ?

सुभाष - आज एक ऑपरेशन होतं,वेळ लागला.

निमा- जेवून घेता ना?

सुभाष - हो,खूप भूक लागलीये. सगळे झोपलेले दिसतायेत.

निमा- हो! रोहन बराच वेळ वाट बघत होता, पण नंतर झोपला आजीसोबत.

सुभाष- तू जेवलीस?

निमा- नाही! घेते आता वाढून.

सुभाष - तू का नाही जेवलीस? का थांबलीस?

निमा - असंच......


दोघे जेवायला घेतात. हॉस्पिटलमध्ये घडलेल्या काही गोष्टी सुभाष निमाला सांगतो. जेवणं आटोपल्यावर सुभाष निमाला आवराआवरी करायला मदत करू लागतो.

निमा- अहो,तुम्ही दमून आलात कशाला मदत करताय? मी आवरते.

सुभाष- असंच.....

निमा नकळत हसते...हे कसले बंध????


सुभाष - आईबाबा आले आणि खूप आधार वाटला. मी टाळत होतो सांगायला खरतर. त्यांना टेन्शन नको म्हणून....


निमा- हे नातं शब्दात मांडणे शक्यच नसतं हो ना?? माझे आईबाबा खूप लहानपाणीच मला सोडून गेले. त्यांचा आधार काय असतो हे माझ्याशिवाय कोणाला समजू शकते? आईबाबा नसले की ते नातं आपण इतर नात्यात शोधत राहतो. पण ते निर्व्याज प्रेम,निरपेक्ष माया,आपुलकी कुठल्याच नात्यात मिळत नाही. हक्काचं नातं,रक्ताचं नातं,फक्त माझं असं आपण आईबाबांनाच म्हणू शकतो.


सुभाष- ओह सॉरी! मला हे माहीत नव्हतं.


निमा- मी खूप लहान होते,आई गेली तेव्हा! मला फारशी ती आठवतही नाही. एक खूप जुना फोटो आहे तिचा आणि बाबांचा.. लग्नातला किंवा नंतरचा असावा. त्या फोटोतील चेहरा म्हणजे आई एवढंच मला आठवतं. बाकी तिचा आवाज माहीत नाही. तिचा स्पर्श काहीच नाही आठवत. बाबा मात्र आठवतात मी 12 वी  झाल्यावर बाबा वारले. पण त्यांनी खूप लाड केले. मी एकटीच असल्याने असेल कदाचित पण मी त्यांचा जीव की प्राण. मी खूप चांगले शिकावे हा त्यांचा नेहमी प्रयत्न राहिला. शिक्षणाचे खूप महत्व सांगायचे मला. मीही त्यांची कुठली गोष्ट टाळली नाही. आमच्या दोघांचंच एक जग होतं. मैत्रिणीच्या आई पहिल्या की असं वाटायच आई अशी असते,आपल्याला ही हवी होती. पण ते तेवढ्यापुरते. स्वराताई माझ्यशेजारी राहायची तिच्या आईला मी मावशी म्हणायचे. म्हणून आम्ही मावसबहिणी,रक्ताचं नाही पण हृदयाचं/मनाचं नात जोडलं गेलं. आणि ते इतके वर्षही कायम राहिले. प्रत्येक प्रसंगात आम्ही दोघी एकमेकींसोबत राहिलो. आम्ही घट्ट मैत्रिणी तसंच बहिणीही. MBA पूर्ण करून इकडे शहरात आले. ताईने सांगितलं इकडे खूप संधी आहेत आणि म्हणून इकडे यायचा निर्णय घेतला.

सुभाष- हो,तू खूप हुशार आहेस हे स्वरा मला सांगायची. तू इथे नक्की तुझ्या स्वप्नांना पूर्ण करण्याचा प्रयत्न कर,मी हवी ती मदत करेल तुला.

निमा- हो पण आधी ताई माझी priority आहे.  खूप रात्र झालीये..झोपू यात आता,तुम्हालाही झोप आली असेल, वेळ कसा जातो कळत नाही बोलण्यात..गुड नाईट


सुभाष- येस,गुड नाईट


निमा हळूच खोलीत शिरते,अंग टाकते,बराच वेळ तिला झोप लागत नाही,आपण पहिल्यादा इतकं कुणाशी मोकळेपणी बोलतोय,त्यांना का मी इतकं सगळं सांगतेय? का ?


©शीतल दरंदळे


क्रमशः


Lovestory


Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या