Ad Code

Responsive Advertisement

रजनीकांत मराठी - दादासाहेब फाळके पुरस्कार


रजनीकांत मराठी (rajani kant marathi) - दादासाहेब फाळके पुरस्कार (dada saheb falake)

 
सुपरस्टार या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? तर मी म्हणेन रजनीकांत. इतकं मोठं वलय आहे या नावामागे. या सुप्रसिद्ध सुपरस्टार ला दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झालाय तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे अजिबात नाही. 51 व्या दादासाहेब फाळके( dada saheb falake award) पुरस्काराने गौरविण्यात येईल.

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरुवारी घोषणा केली. यावेळी कोरोना विषाणूमुळे सर्व पुरस्कारांना उशीर झाला आहे.नुकतीच राष्ट्रीय पुरस्काराची घोषणाही करण्यात आली आहे. दादासाहेब फाळके हा भारतीय सिनेमाचा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. प्रकाश जावडेकर पत्रकार परिषदेत म्हणाले- आज महान नायक रजनीकांत यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करून आम्हाला आनंद झाला. रजनीकांत गेली दशके सिनेमावर राज्य करत आहेत. यावर्षी निवड मंडळाने हे केले आहे. निर्णायक मंडळामध्ये आशा भोसले, मोहनलाल, विश्वजित चटर्जी, शंकर महादेवन आणि सुभाष घई अशा कलाकारांची नावे आहेत.
रजनीकांत यांचा जन्म महाराष्ट्रातील मराठा हेंद्रे पाटील मराठा समाजात झाला. रजनीकांत यांचे पूर्ण नाव शिवाजीराव गायकवाड, वडील रामोजीराव आणि आईचे नाव जिजाबाई गायकवाड आहे.

रजनीकांत यांनी २४ फेब्रुवारी १९६१ रोजी तिरुपती, आंध्र प्रदेश, इतिराज महाविद्यालयातील गच्चीवर लता रंगाचारीशी (Latha Parthasarathy)  लग्न केले, ज्यांनी महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांची मुलाखत घेतली होती.

रजनीकांत यांची कमाई १०० करोड इतकी आहे. त्यांना २ मुली आहेत. ऐश्वर्या आणि सौन्दर्या असे त्यांच्या मुलींचे नाव आहे.(Aishwarya Rajinikanth and Soundarya Rajinikanth daughters) 

सुरुवातीला अपयशानंतर रजनीकांत यांनी खूप मेहनतीने या क्षेत्रात आपले नाव कमावले. फक्त वेगळी स्टाइल असून चालत नाही, तर प्रचंड मेहनत ही लागते. हे त्यांनी सिद्ध केलं. अगदी गॉगल लावायची स्टाइल, रुमाल खांदयवर घ्यायची पद्धत खूप प्रसिद्ध झाली. आजही या 75 वयाच्या कलाकाराचे चित्रपट लागल्यावर रांगा लागतात. हेच वलय त्यांना राजकारणात आणत होते पण प्रकृतीच्या कारणांमुळे त्यांना राजकारणात प्रवेश घेता आला नाही. नाहीतर तर ती जादू राजकारणाही झाली असती.

बॉलिवूड अभिनेते ही आज त्यांचे चाहते आहेत. सुपरस्टार रजनीकांत यांचे खूप अभिनंदन. 

आवडल्यास नक्की कमेंट करा


रजनीकांत मराठी (rajani kant marathi) - दादासाहेब फाळके पुरस्कार (dada saheb falake)

 



राजांनीकांत मराठी


 




Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या