Ad Code

Responsive Advertisement

लाईफपार्टनर (भाग 1)

 

लाईफपार्टनर (भाग 1)


रोहन - आईगं चल ना फिरायला? तू का नाही येत आहेस? काय झालंय तुला?

लहानग्या रोहनचा आवाज ऐकून स्वराला अजूनच कसतरी झालं. अवघा पाच वर्षाचा रोहन त्याला माहित ही नाही आणि कळतही नाही.

एक महिन्यापूर्वी स्वराला कॅन्सर डिटेक्ट झालाय, 3rd लेवल. स्वराचा नवरा सुभाष स्वतः एक नामवंत डॉक्टर कॅन्सर स्पेसिलिस्ट. आताच त्यांचं हॉस्पिटल नावारूपाला आले होते. स्वरा, सुभाष आणि रोहन यांचं छोटंसं सुखी कुटुंब.

स्वराला आधी कसलाच विशेष त्रास जाणवला नाही. फक्त दातातून रक्त यायचं  निमित्त झालं आणि ब्लड कॅन्सर डिटेक्ट झाला. सुभाष पुरता कोसळून गेला. सहाच वर्ष झाले लग्नाला. सुभाषचं हॉस्पिटलही अगदी जोरात चालू होतं. दोघांचा सुखी संसार सुरळीत चालू होता. रोहनच्या जन्मानंतर तर अजून आनंदीआनंद झाला होता. पण अचानक हे संकट काही चाहूल न देता अचानकपणे आले होते.

स्वतः डॉक्टर असल्यामुळे सुभाषला सगळं माहीत होतं. स्वराला कल्पना दिली होती,कारण डॉ. सुभाषचे सर डॉ. प्रवीण यांनी तसं सांगण्यास सांगितलं होतं. ऍडव्हान्स उपचार सुरू होते. तो हवे ते सगळे प्रयत्न करत होता. निरनिराळ्या एक्स्पर्टशी बोलणे चालू होते. अगदी गरज लागली तर परदेशी जायचीही सुभाषची तयारी होती. पण सध्या गरज नव्हती अस डॉ प्रवीण यांनी सांगितलं होतं.

गेले २ महिने खूप टेन्शनमध्ये गेले होते. छोट्याश्या रोहनला तर काही समजत नव्हते पण त्याला अनेक प्रश्न पडायचे. ज्याची उत्तरं देणं स्वरा आणि सुभाषला जड जायचे.  रोहनच्या आजच्याही प्रश्नाला कसे उत्तर द्यावे हे स्वराला कळेनाच. सुभाषने त्याला जवळ घेतले आणि म्हणले, "आईला बरं नाहिये म्हणून आता नको नेऊयात. फक्त तू आणि मीच जाऊयात बागेत"

रोहन - "नको मी आईसोबतच येणार,तू डॉक्टर आहेस ना तिला लवकर बरं कर"

सुभाष - "रोहन आईला त्रास द्यायचा का आपण असा,शहाणा आहेस ना तू,चल बरं निमा मावशी वाट पाहत असेल." रोहन खट्टू होऊन सुभाष सोबत जातो.

स्वरा ची बहीण निमा त्यांच्याकडे आली होती रहायला.निमामावशी सगळं घरच बघत होती.रोहन ची काळजीही घेत होती. स्वराला खूप आधार होता निमाचा अगदी पहिल्यापासून. म्हणायला मावस बहिणी पण सख्ख्या बहिणी पेक्षा जास्त प्रेम एकमेकीवर. निमा स्वरापेक्षा 5 वर्षांनी लहान,तिचं शिक्षण होऊन ती कामाच्या शोधात स्वराकडे राहायला आली.पण अचानक हे मध्ये संकट उगवलं आणि तिने इथेच राहायचा निर्णय घेतला.

निमा आणि रोहनची खूप छान गट्टी जमली होती.रोहन तिच्यासोबत खूप आनंदात असे.निमाला ही रोहन चा लळा लागला होता. रोहन ने मग निमाला बरोबर यायचा हट्ट केला.

सुभाष,निमा आणि रोहन मग बागेत एकत्र गेले. रोहन बागेत बॉल खेळत होता.सुभाष आणि निमा त्याच्यावर लक्ष ठेवून होते.

निमा  - " लहान मूल किती लवकर रडतात आणि लगेच खुश ही होतात ना?

सुभाष - " होय,निर्मळ मनाची असतात,रोहन तर किती लहान आहे अजून, त्याला.."

निमा -  " तुम्ही नका काळजी करू,त्याच्यासाठी तुम्हाला खूप खंबीर व्हावं लागेल"

सुभाष - " कसं होऊ? कसं समजवू त्याला आणि मी स्वतःला ही, स्वरा खूप महत्वाची आहे ग माझ्या आयुष्यात"

निमा - "नवरा बायको हे नातं जेव्हा देव निर्माण करतो ना तेव्हा तो कदाचित हेच गृहीत धरत असावा की ही साथ आता जन्मभराची,पण जेव्हा एकाची साथ सुटेल असं वाटतं तेव्हा दुसऱ्याने स्वतःला सवरायच कसं? हे उत्तर तर तो ही देऊ शकणार नाही."

सुभाष-  " तो असं मग करतोच कशाला? स्वतः जोडी मध्ये बसलेला असतो,आणि मलाच अशी शिक्षा का?"

निमा - "हे उत्तर कधी सापडतच नाही,माझ्याच नशिबात अस का? हा प्रश्न माणसाला माणूस म्हणून वेगळं ठरवतो? इतर कोणत्याही जिवंत प्राण्याला हा प्रश्न पडत नाही.

सुभाष - " इतक सहज असत का सगळं? तू बोलण्यात खूप हुशार आहे निमा, "

निमा -  " डॉक्टरांनी इतरांना हुशार बोलणे म्हणजे हुशार या शब्दाचा अपमान नाही का?

सुभाष हताश हसला. इतक्यात रोहन धावत आला,icecream साठी हट्ट करू लागला.  सुभाष ने जाऊन त्याच्यासाठी   आईसक्रीम आणलं. तिघेही घरी परतले.


क्रमशः


Lovestory



©शीतल दरंदळे


Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या