Ad Code

Responsive Advertisement

कविता - अव्यक्त

 अव्यक्त

होते असे कधी कधी
वक्त करता येत नाही
मनात कितीही साचलं तरी
मोकळं होता येत नाही.........
ती ओळखते ,तो ओळखतो
खरी भेट होता होत नाही
बोलू इच्छिते मन जरी
आवाज समोर पोहचतच नाही;

शब्द कधी कधी दडून बसतात
भावना मग अश्रू होतात
बरसत राहतात डोळ्यांमधून
पण कोणी पुसायला येत नाही,
होते असे कधी कधी
व्यक्त करता येत नाही
मनात कितीही साचलं तरी
मोकळं होता येत नाही.......
माजतो कोलाहल नुसता
आवाज बाहेर होत नाही
आक्रोश या मनाचा
ओठापर्यंत पोहोचत नाही;

लेखणीही मूक होते
कागदावर उमटत नाही
कसे लिहू काय लिहू
सुन्न सारे,सुचत नाही,
होते असे कधी कधी
व्यक्त करता येत नाही
मनात कितीही साचलं तरी
मोकळं होता येत नाही.......


शीतल अजय दरंदळे

(कविता आवडल्यास नक्की शेयर करावी. धन्यवाद. अजूनही कथा, लेख वाचण्यास home page वर जावे. धन्यवाद)


कविता



Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या